शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

होळी अन रंगोत्सव साजरा करतांना हे लक्षात ठेवा….महावितरणने दिल्या या खबरदारीच्या सूचना

by Gautam Sancheti
मार्च 11, 2025 | 3:48 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250311 WA0238 e1741688285385


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- होळी, धुळवड आणि विविध रंगांची उधळण करीत येत असलेल्या रंगपंचमी या सलग सणांच्या मालिकेत आनंद व उत्साहासोबत संभाव्य वीज अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळी पेटविताना व रंगांची उधळण करताना वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगून सणांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

रंगोत्सव साजरा करताना सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत, याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडणे व यातून अपघाताचा धोका संभवतो. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या असून या भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी. जेणेकरून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर होळी पेटवावी. विजेचे अपघात प्राणघातक ठरू शकतात, एक चूकही जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी. रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकतांना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करणे टाळा. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्या. घरात होळी खेळतांना वीज मीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा व ओल्या हाताने या वस्तू हाताळू नका. आवश्यक ती खबरदारी घेऊन होळी, धुळवड व रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

हे लक्षात ठेवा –

- वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा.
- वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.
- ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा.
- वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

औद्योगीक वसाहतीत दोघांनी फॅब्रीकेशन व्यावसायीकास लुटले…४० हजाराची रोकड बळबजबरीने काढून घेतली

Next Post

कमवा शिका’ योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा २ हजार मिळणार….प्रस्ताव विचाराधीन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Oplus_131072

कमवा शिका’ योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा २ हजार मिळणार….प्रस्ताव विचाराधीन

ताज्या बातम्या

shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0304

राज्य शासनाने शहरासाठी ७ पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ…मुख्यमंत्री

ऑगस्ट 8, 2025
fir111

ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी…तीन जणांवर गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011