मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक परिमंडळात १२ हजार ४१४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत, ८४ कोटी रुपये थकबाकी…

by India Darpan
जानेवारी 27, 2025 | 6:54 pm
in इतर
0
IMG 20250127 WA0247 2 e1737984260741

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक परिमंडळातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक व ईतर वर्गवारीच्या ४ लाख ८२ हजार ३३० ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ८३ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी असुन, थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलातील जानेवारी महिन्यात १२ हजार ४१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

नाशिक परिमंडलातील महावितरणच्या घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, सार्वजनिक सेवा व ईतर वर्गवारीच्या ४ लाख ८२ हजार ३३० ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ८३ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी असुन यामध्ये नाशिक मंडळातील १ लाख ८२ हजार १२२ ग्राहकांकडे २७ कोटी ३० लाख रुपये, मालेगांव मंडळातील ५४ हजार ०९१ ग्राहकांकडे ७ कोटी ६७ लाख रुपये, अहिल्यानगर मंडळातील २ लाख ४६ हजार ११७ ग्राहकांकडे ४९ कोटी ०२ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे नाशिक परिमंडलातील सर्वच विभागामध्ये वीज थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम जोरात सुरु आहे या अंतर्गत जानेवारी महिन्यात १२ हजार ४१४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्याबरोबरच थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले त्यानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये नाशिक परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अधिकारी व अभियंते यांनी सुद्धा नाशिक शहरामध्ये थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम राबविली आहे. दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीजबिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीतझाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास अवधी लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

Next Post

एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ…राज्यातील २४ लाख या शिधापत्रिका धारकांना मिळणार लाभ

Next Post
savkare 1024x683 1

एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ…राज्यातील २४ लाख या शिधापत्रिका धारकांना मिळणार लाभ

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011