नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा महावीर जयंतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक कॅलेंडरमध्ये ३ आणि ४ एप्रिल रोजी महावीर जयंती दर्शविण्यात आली आहे. मात्र, ही जयंती नक्की कधी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात ज्योतिषाचार्य प्रशांत चौधरी यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
ज्योतिषाचार्य चौधरी यांनी सांगितले आहे की, दिनांक तीन व चार एप्रिल या तारखांना महावीर जयंती दिलेली आहे. चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. त्रयोदशी अहोरात्र असल्यास अहोरात्रचे दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. म्हणून 3 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगाव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश, गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटक मधील बेळगाव, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर महावीर जयंती आहे.
तर चार एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, विजयपूर, कुलवगिरी, गदक, हावेरी, मैसूर, बंगळुरू, संपूर्ण मध्य प्रदेश, जयपुर, अजमेर, हरियाणा व पंजाब या प्रदेशामध्ये महावीर जयंती आहे. तसा संदर्भ दाते पंचांगामध्ये दिलेला आहे, असे चौधरी यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642153739023953922?s=20
Mahavir Jayanti Celebration Date Clarification