इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॅान बैठका पार पडल्या. त्यात फॅार्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. या फॅार्म्युलावर पुढच्या आठवड्यात सलग तीन दिवस मॅरेथॅान बैठक घेऊन शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या चर्चेत काँग्रेस १००, ठाकरे गट १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गट ८४ जागा तर मित्रपक्ष ४ जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे.
आताच्या झालेल्या बैठकीत जवळपास ८० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. २५० जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे.. तिढा असलेल्या जागांवर आता चर्चा केली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जाणार आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, जागावाटपाची चर्चा आता जवळपास संपुष्टात आली आहे. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जवळपास २०० ते २५० जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे. दस-याच्या मुहूर्तावर आम्ही यादी जाहीर करुन टाकू.