इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर विरोधात महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पाय-यावर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जर कोणी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याची भूमिका घेत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच महापुरुषांचा अवमान करण्याची भूमिका वारंवार घेतली जाते, राहुल सोलापूरकर महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आणि प्रशांत कोरटकर ह्यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत ह्यांना धमकी दिली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.
बघा, आंदोलनाचा व्हिडिओ