मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ८ महिन्यातच राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यातून फक्त शिवरायांचा अवमानच नाही तर, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागली. असे सांगत महाविकास आघाडीतर्फे आज सकाळी १० वाजता महाराष्ट्रद्रोही सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबईत हुतात्मा स्मारकापासून हे आंदोलन सुरु होणार आहे. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन हे आंदोलन केले जाणार आहे. सत्तेचा माज मस्तवाल लोकांच्या डोक्यात गेला आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
या आंदोलनाला पोलिसांनी परवाणगी दिलेली नाही. तरी महाविकास आघाडी हे आंदोलन करणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.