मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष सर्वे करत आहे. त्यात महाविकास आघाडीने अंतर्गत केला असून त्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल हे समोर आले आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षाला किती जागा मिळेल हे सुध्दा या सर्व्हेत आहे. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून सर्वाधिक ८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ५५-६० जागा मिळू शकतात. तर ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून ३२ – ३५ जागाच मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या सर्व्हेत महायुतीला किती जागा मिळेल याचा अंदाज सुध्दा व्यक्त करण्यात आला आहे. त्यात भाजपला ५५ जागा, शिंदेंच्या शिवसेनेचा ३३ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकुणच या सर्व्हेचे आकडे लोकसभेत मिळालेल्या यशाच्या बरोबरीचे असल्याचे बोलले जात आहे.