नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे, देशाचे विरोधी पक्ष नेते हे इन्स्टिट्यूशन आहेत. प्रधानमंत्री यांची प्रतिष्ठा ही देशाने ठेवली पाहिजे तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिष्ठा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी कालच्या १५ ऑगस्टला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाठच्या ओळीत बसवले असे सांगत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना ही टीका केली. यावेळी पवार म्हणाले की, मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अटल बिहारी यांचे सरकार होतं आणि मला आठवतंय या सभेमध्ये माझ्या बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टर यांच्या बरोबरची होती. मला आठवतंय मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज या विरोधी पक्ष नेत्या होत्या आणि याच १५ ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्रांच्या रांगेत सुषमाजी सुद्धा बसलेल्या होत्. याचा अर्थ व्यक्ती हा प्रश्न नाही या संस्थांचे प्रश्न आहेत. ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या वरती असते. त्यामुळे त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जरी ठेवली तरी ती त्यांच्याकडून ठेवली केली गेली नाही. त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांवर, त्या पद्धतीवर किंचितही विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले त्यामुळे आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे.
आज देशाच्या पार्लमेंटमध्ये मी बघतो देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे काही सदस्य याठिकाणी व्यासपीठावर आहेत. हल्लीच राज्यसभेचे आणि लोकसभेचे अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आले नाहीत. त्या साधनांची किंमत त्याचे प्रतिष्ठा याचं महत्त्व याच्याकडे ढुंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे. त्याची प्रचिती आम्ही लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते असेही ते म्हणाले.