मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करा. शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचे काम करतो त्याला गाडून टाकतो. आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देतो असे सांगत उध्दव ठाकरे यांनी खुलं आव्हान दिले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला. त्याची पुनरावृत्ती नको. २० आणि २५ वर्ष आमची युती होती. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण होते. त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पाडले जात होते. पाडापाडीचे राजकारण व्हायचे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. त्याचवेळी त्यांनी या नेत्यांना खुलं आव्हान दिले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार? असे विचारले जात आहे. आजच्या मेळाव्यास पृथ्वाराज चव्हाण आहेत, शरद पवार आहेत. मी त्यांना सांगतो, आता मुख्यमंत्रीपदाचा जाहीर करा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणाचेही नाव जाहीर करा. असे सांगत उध्दव ठाकरे यांनी यावेळी जोरदार भाषण केले.