इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापान कार्यक्रमाला जायचं म्हणजे पापच ! भ्रष्टाचाराचे डाग घेऊन जे लोकं चहापान कार्यक्रमाला जातील, त्याच लोकांकडे बघून मुख्यमंत्री म्हणतील; ह्याच लोकांवर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
यावेळी ते म्हणाले की, ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचं नाव दिलं गेलं; त्यावरच खड्डे पडले आहेत, नदी वाहत आहे, हे नेमकं काय चाललंय ?
‘लाडका कंत्राटदार’ योजनेतून जे पैसे काढले गेले, तेच पैसे आता नेते फोडायला आणि स्वतःच्या गटाला बळकटी द्यायला वापरले जात आहेत.
असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे नेते विजय वडेटीवार, सतेज पाटील, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर उपस्थित होते.