मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्य लढत होणार आहे. या दोन्ही आघाडीत एकुण सहा पक्ष असून त्यामुळे कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी आता महाविकास आघाडीचे आकडे समोर आले आहे.
महाविकास आघाडीने अगोदर ८५-८५-८५ चा फार्म्युला ठरवला होता. पण, आता त्यात बदल झाला आहे. या आघाडीत शिवसेना ठाकरे गट ९६, राष्ट्रवादी पवार गटाने ८७ तर काँग्रेसने १०२ विधानसभेसाठी उमेदवार दिले आहे. त्यामुळे एकुण २८५ उमेदवार या तिन्ही पक्षांनी दिले आहे. पाच जागेवर दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे.