नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची तातडीने पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या यादीत काही बदल होऊ शकतात अशी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ८५-८५-८५ असा तूर्तास फॅार्म्युला ठरला आहे. मित्र पक्षाला १८ जागा दिली जाणार आहे. उद्या याबाबत अधिकृत घोषणा कऱणार आहे.
ठाकरे गटाने प्रसिध्द केलेल्या यादीत आदित्य ठाकरे, केदार दिघे यांच्याबरोबरच नाशिक मध्यचे माजी आमदार वसंत गीते, नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे, नांदगाव – गणेश धात्रक, यांच्या नावाचा समावेश आहे. महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होण्याअगोदर ठाकरे गटाने एबी फार्म दिले. त्यानंतर अधिकृतपणे ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.