इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॅान बैठका पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातून जागा वाटपाचे सूत्र समोर आले आहे. यात काँग्रेस १०५ -११०, ठाकरे गट ९०-९५ तर राष्ट्रवादी शरद पवार गट ७५-८० जागा देणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर या जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे. या जागावाटपाबाबत अधिकृतपणे अजून कोणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आज त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकीत जवळपास ९० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले होते. पण, काही महाविकास आघाडीमध्ये सहमती होत नव्हती.या तिढा असलेल्या जागांवर मंगळवारी पुन्हा चर्चा झाली. त्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात आला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला देण्याचा निर्णय़ झाला आहे. जिंकलेल्या काही जागांमध्ये बदल केला गेला आहे.
दरम्यान अधिकृत घोषणा होण्याअगोदर शरद पवार गट व उध्द ठाकरे गटाने एबी फॅार्म वाटप सुरु केले आहे. या निश्चित असलेल्या जागेवर ते देण्यात आले आहे.