इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असून त्यामुळे हा वाद आघाडीत बिघाडी करतो की वादांवर पडदा पडतो हे आता औत्सुक्याचे आहे. शिवसेना ठाकरे सेनाने थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली आहे. पटोले जागावाटपाच्या चर्चेला उपस्थितीत असतील तर आमचे नेते त्या बैठकीला जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीचे जवळपास २६० जागेवर अंतिम निर्णय झाला असतांना ही कुरबुर समोर आली आहे. विदर्भातील काही जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. या जागांवर काँग्रेस, ठाकरे सेनेकडून दावे करण्यात आले आहे.
खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत पटोंलेंवर निशाणा साधला. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत. त्यांना वारंवार दिल्लीला यादी पाठवावी लागते. मग चर्चा होते. त्यात बराच वेळ गेलेला आहे. आता हाती फार वेळ उरलेला नाही. त्यामुळे आता आम्ही थेट दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी बोलू. त्यानंतर या विधानाचे पदसाद उमटले