इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॅान बैठका पार पडल्यानंतर आता महाविकास आघाडीच्य गोटातून जागा वाटपाचे सूत्र समोर आले आहे. यात काँग्रेस ११९, ठाकरे गट ८६ तर राष्ट्रवादी शरद पवार गट ७५ जागा, शेकाप व समाजवादी पक्षाला प्रत्येकी ३, कम्युनिष्ट पक्षाला २ देणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे. या जागावाटपाबाबत अधिकृतपणे अजून कोणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकीत जवळपास ८० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. २५० जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती आहे.. तिढा असलेल्या जागांवर आता चर्चा केली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जाणार आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून त्यात विधानसभेची घोषणा होणार आहे. त्यात आता महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र समोर आले आहे. या जागा वाटपाबाबत शरद पवार समाधानी असले तरी ठाकरे गटाची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही.