इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू – काश्मिर व हरियाणा विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. महाविकास आघाडीनेही मॅरेथॅान बैठका घेऊन जागा वाटपाचा तिढा जवळपास सोडवला असून २५० जागावर एकमत झाले असल्याची मोठी अपडेट आहे. उर्वरीत ३८ जागांवर मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.
आज तिढा असलेल्या या जागांवरचर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. हा तिढा सुटला की महाविकास आघाडी लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस १००, ठाकरे गट १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गट ८४ जागा तर मित्रपक्ष ४ जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे.
गेल्या वेळेस झालेल्या बैठकीत जवळपास ८० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. २५० जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाल्याची सूत्रांची माहिती दिली होती. तिढा असलेल्या जागांवर आता चर्चा केली जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जाणार आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दस-याच्या मुहूर्तावर यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.