अहिंसेचे विचार जागतिक शांततेसाठी उपयुक्त – भुजबळ
नाशिक – जगभरात धर्माच्या नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष पसरत असून जागतिक शांतता भंग होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग अवलंबावा अशी शिकवण दिली. भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश जर जगाने स्वीकारला तर जगभरात कुठेही भांडण होणार नाही जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार अतिशय उपयुक्त आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री.रसिकलाल एम.धारिवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आचार्य श्री पुलकसागरजी महाराज,शोभाताई धारीवाल,जान्हवी धारीवाल, रमणलाल लुंकड,सोहनलाल भंडारी, माजी महापौर रंजना भानसी, नंदलाल पारख, डॉ.एन. पी. छाजेड, मदनलाल साखला, विलास शहा, राजेंद्र जैन, डॉ.प्रशांत छाजेड, रमेश फिरोदिया, पुनीत बालन, प्रमोद दुगड, सतीश पारख, दिपक बागड, सुजाता सराफ, बाबूभाई संचेती, सुमेरकुमार काले, निर्मलभाई गोदा, मोहनलाल चोपडा, राजमल भंडारी, विलासभाई शहा, सोनल, दगडे,मंगलचंद साखला, कांतीलाल साखला, पोपटलाल सुराणा, किसनलाल सारडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.