पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
या परीक्षेसाठी प्रविष्ठ एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थीपैकी ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करुन १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. पात्र उमेदवारांना अंतिम निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम) यांच्यामार्फत यथावकाश पाठविण्यात येईल, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.