श्रावण मास विशेष :
नाशिकमधील दोन वैशिष्ट्यपूर्ण महादेव मंदिरं!
महाशिवरात्री निमित्त’ इंडिया दर्पण’ च्या वाचकांना विशेष भेट. सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांतील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यांत असल्यामुळे दरवर्षी नाशिक येथील महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्रोत्सवानिमित्त इंडिया दर्पण च्या वाचकांना दोन आगळ्या वेगळया शिवमंदिरांचा परिचय करून देत अाहोत. यातील पहिले शिवमंदिर अतिप्राचीन आहे तर दुसरे आधुनिक नवीन शिवमंदिर आहे.
यातील पहिले शिवमंदिर म्हणजे रामकुंडा समोरचे श्रीकपालेश्वर मंदिर.या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातले एकमेव शिवमंदिर असे आहे जिथे महादेवासमोर नंदी नाही! कपालेश्वर मंदिराचे हे वैशिष्ट्य का निर्माण झाले त्याची आख्यायिका आणि कपालेश्वर मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन विजय गोळेसर यांनी या व्हिडिओत करून दिले आहे.
दुसरे शिवमंदिर म्हणजे ब्रह्मगिरीच्या निसर्गसंपन्न कुशीत दहा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेले प्रति केदारनाथ मंदिर. सध्या भरपूर प्रसिद्धीस आलेले हे प्रति केदारनाथ मंदिर कधी, कुठे, कुणी आणि का बांधले याची सविस्तर माहिती ‘ ब्रह्मगिरीच्या कुशीतील प्रति केदारनाथ मंदिर या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी दिली आहे.
महाशिवरात्री निमित्त या दोन वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिरांचा परिचय वाचकांना निश्चित आवडेल याची खात्री आहे.
– विजय गोळेसर
मोबाइल – ९४२२७६५२२७
Mahashivratri Special Nashik 2 Special Shiv Temples Video