रुद्राक्ष महात्म्य
महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करण्यास विशेष महत्त्व आहे. रुद्र आणि अक्ष असे दोन शब्द मिळून रुद्राक्ष शब्द बनला आहे. रुद्र म्हणजे भगवान शंकर व अक्षर म्हणजे त्याचे नेत्र. रुद्राक्ष हे भगवान शिवाचे नेत्र किंवा अश्रू आहेत, अशी पौराणिक मान्यता आहे. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया येथून भारतात रुद्राक्ष मोठ्या प्रमाणावर येत असतात.
रुद्राक्ष मुख
रुद्राक्ष वर खालपासून वरपर्यंत गोलाकार असणाऱ्या धारा यांना रुद्राक्ष मुख असे म्हटले जाते. 1 मुखी पासून 21 मुखी पर्यंत रुद्राक्ष आढळतात. स्पष्ट मुख, धारा, रवेदारपणा, एक संघता, रुद्राक्षाचे रंग यावरून रुद्राक्षाची किंमत ठरते. सम संख्येत मुख असलेल्या रुद्राक्ष पेक्षा विषम मुख संख्येत असलेल्या रुद्राक्ष याची किंमत जास्त असते. तपकिरी, लाल, काळा, करडा असे रंग रुद्राक्ष मध्ये असतात.
कुंडलीतील ग्रह योगा प्रमाणे कोणता रुद्राक्ष धारण करावा?
कुंडलीतील मुख्यतः रवीच्या स्थानावरून रुद्राक्ष धारण करावा. कुंडलीतील रवी हा षष्ठम, अष्टम अथवा द्वादश ठिकाणी असल्यास एक मुखी अथवा सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. रवी, केतू अथवा राहू युक्त असल्यास तीन किंवा सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. रवी हा शनी युक्त असल्यास नवमुखी रुद्राक्ष धारण करावा. रवी गुरु सोबत असल्यास पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. कोणताही रुद्राक्ष त्याचप्रमाणे नऊ मुखा पुढील रुद्राक्ष हे प्रत्यक्ष कुंडली, हस्तरेषा बघून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची नियमावली समजून घेऊन धारण करावा.
ओम नमः शिवाय