नाशिक – महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी श्री. कपालेश्वर मंदिर परिसरातील वााहतुकीत बदल करण्यात आला आहे. यंदा महाशिवरात्रीस मोठ्या प्रमाणात कपालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. गाडगे महाराज पुलाखालील गौरी पटांगणावर वाहने पार्क करून भाविकांना दर्शनासाठी जाता येईल. कपालेश्वर मंदिराकडे येणारे मार्ग मालेगाव स्टॅण्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, शनी मंदिर, मालवीय चौक, दुतोंड्या मारूती तसेच साई बाबा मंदिराकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर बँरीकेटींग करण्यात लावण्यात आली.