मुंबई – राज्यात येते काही दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र, अवघे काही जिल्हे सोडले र संपूर्ण राज्यात पाऊस होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानेच तशी माहिती दिली आहे. राज्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलैचा दुसरा आठवडा सुरू होऊनही पावसाची ओढ कायम आहे. येत्या काही दिवसात केवळ कोकणातच मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. येत्या काळात संपूर्ण राज्यात पाऊस नक्की कधी बरसेल हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाने पावसाचा दिलेला अंदाज असा