पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठमोळा खाद्यपदार्थ असलेल्या मिसळ पावचा जागतिक सन्मान झाला आहे. कारण, जगातील सर्वोत्कृष्ट पारंपारिक शाकाहारी पदार्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्राच्या मिसळ पावने ११ वे स्थान पटकावले आहे. त्यामुळे भारतीय पाककृतीने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लक्ष वेधले आहे.
फूड गाइड प्लॅटफॉर्म टेस्ट अॅटलसने ही यादी जाहीर केली. याशिवाय, राजमा चावल आणि इतर भारतीय स्वादिष्ट पदार्थ देखील यादीत आले आहेत. उत्तर भारतातील लोकांची आवडती, राजमा चावलने ४१ वे स्थान पटकावले. मटकीची उसळ, कांदा, लिंबू, कोथिंबीर दही, पापड, पाव, शेव, यापासून तयार झालेला मिसळपाव हा खाद्य शौकिनांचा लोकप्रिय पदार्थ आहे. ठिकाणानुसार वेगवेगळ्या प्रकारात मिसळ मिळते.खान्देशी मिसळ, पुणेरी मिसळ, अहमदनगर मिसळ किंवा नाशिक मिसळ असे वेगवेगळे प्रकार आहेत. २०१५ मध्ये मिसळ पावला जगातील सर्वात चवदार शाकाहारी डिशचा पुरस्कार मिळाला होता.
मिसळ पाव फायबर आणि प्रोटीनने भरपूर असल्याने पौष्टिक आहे. १९६० च्या दशकात कच्छचे केशवजी गाभा चुडासामा यांनी याचा शोध लावला असे मानले जाते. या डिशला जागतिक मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्ये, लंडनमधील फूडी हब अवॉर्ड्समध्ये मिसळ पावला जगातील सर्वात चवदार शाकाहारी पदार्थ म्हणून नाव देण्यात आले. विशेषत: दादरच्या आस्वाद रेस्टॉरंटने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला होता.
इतर अनेक भारतीय पदार्थांनी देखील पहिल्या ५० शाकाहारी पदार्थांमध्ये स्थान मिळवले आहे. आलू गोबीने २० वे स्थान मिळवले आणि त्यानंतर राजमा आणि गोबी मंचूरियन यांनी अनुक्रमे २२ वे आणि २४ वे स्थान मिळवले. लोकप्रिय दक्षिण भारतीय स्नॅक मसाला वडा २७ व्या क्रमांकावर आहे, तर भेळ पुरी ३७ व्या स्थानावर आहे. राजमा चावलला ४१ वे स्थान मिळाले आणि राजमापासून वेगळे डिश म्हणून सूचीबद्ध केले गेले.
Maharashtrian Dish Misal Pav 11 Position in World