इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनमुराद, खळखळवून हसवणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. प्रेक्षक अत्यंत आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. यातील सगळेच कलाकार त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत. हे कलाकारही प्रेक्षकांच्या प्रेमाचा मान ठेवत आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकताच या कार्यक्रमातील एका अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे.
अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, रोहित माने, दत्तू मोरे यासारखे अनेक विनोदवीर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारे अनेक कलाकार यात आहेत. नुकतंच या कार्यक्रमातील एक विनोदवीराने गुडन्यूज दिली आहे. त्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमातील रोहित माने या कलाकाराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित माने याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एका बाळाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. थांबा, हे त्याचं बाळ आहे असा काही विचार करत असाल, तर तसं नाही. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. “या गोड बाळाचा मामा झालोय मी”, अशी कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिली आहे. या बरोबर त्याने मामा-भाचा, प्रेम, लव्ह असे हॅशटॅगही शेअर केले आहेत. रोहित हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आला. या कार्यक्रमामुळे त्याला सर्वत्र ओळख मिळाली.
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane Good News