बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना मिळणार जपानी धडे; या सामंजस्य कराराचा असा होणार फायदा

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 3, 2023 | 1:47 pm
in संमिश्र वार्ता
0
1 2048x1011 1 e1675412224190

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराप्रसंगी वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, आमदार मेघना बोर्डिकर- साकोरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायामाचे आमदार श्री. तानेगुची आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान (AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे

कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समूहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविता यावीत यासाठी राज्य शासन आणि वाकायामा स्टेट, जपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, या कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू घडावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भागवत यांनी केले, तर आभार आमदार मेघना बोर्डीकर यांनी मानले.

Maharashtra Wrestling Japanese MOU Benefits

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना मिळणार आता तब्बल कोटींची शिष्यवृत्ती

Next Post

हवाई प्रवासाबाबत तक्रार करायची आहे? येथे आहे सुविधा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

हवाई प्रवासाबाबत तक्रार करायची आहे? येथे आहे सुविधा

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011