नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होत आहे. काल पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन विधिमंडळातील कामकाज गाजले. आता दुसऱ्या दिवशी काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज दुस-या दिवसाचे कामकाज सुरु होण्याअगोदर सत्ताधारी व विरोधी गट एकमेकांसमोर आले. सभागृहात जाण्यापूर्वी दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीशा तणावपूर्ण वातावरणात या अधिवेशनाचे कामकाज आज सुरु झाले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला की, विधिमंडळातील दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या प्रस्तावांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. ही बाब कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. यावरुन सभागृहात गदारोळ सुरू झाला. अखेर १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज संस्थगित करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
बघा, विधिमंडळ अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Winter Assembly Session Live Telecast
Nagpur