शक्यते प्रमाणे आज शुक्रवार ३१ मार्च पर्यन्त ढगाळ वातावरण झळकले. परंतु उद्या शनिवार दि. १ एप्रिल पासुन पुढील ५ दिवस (५एप्रिल पर्यंत)महाराष्ट्रात ढगाळ अथवा अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नाही. त्यामुळे पीक काढणीत असलेल्या शेतकऱ्यांनी बिनधास्त राहून काढणी उरकावी, असे वाटते. जास्तीत जास्त विदर्भात उद्यापर्यंतही कदाचित अवकाळी वातावरणाची शक्यताही जाणवते.
सोमवार दि.६ एप्रिल ते गुरुवार ९ एप्रिल पर्यन्तच्या ४ दिवसात सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर व संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील ( बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता ) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे जिल्ह्यात वरील वातावरणाचा परिणाम उद्यापासून ते जवळपास संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नाही, असे वाटते. तसेच काही असल्यास कळवले जाईल.
परवा रविवार दि. २ एप्रिल पासुन दुपारच्या तापमानात काहीशी वाढ होत असली तरी येत्या १५ दिवसापर्यंत (१५ एप्रिल पर्यन्त ) महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. कदाचित संपूर्ण एप्रिल महिनाही उष्णतेच्या लाटेविना जाऊ शकतो असे वाटते.
वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोंवतालचा परिसरात आज व उद्या अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी ह्याचीही नोंद घ्यावी असे वाटते. सध्या विशेष एव्हढेच!
Maharashtra Weather Forecast Climate April