मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सर्व भागात सध्या कडाक्याच्या उन्हाने सर्वसामान्य अक्षरशः भाजून निघत आहेत. काही ठिकाणी तर तपमानाचा पारा ४० अंशांच्याही पुढे गेला आहे. अशा स्थितीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागात येत्या २१ आणि २२ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गेल्या काही काळात दिलेले हवामान अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता.
-IMD pic.twitter.com/oWES7UWD9Q— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 18, 2022