गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान राज्यात सुरू आहे. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा, गारपीट यामुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागात ही स्थिती आहे. त्यामुळे हे वातावरण कधीपर्यंत राहील, असा प्रश्न शेतकऱ्यांसह सर्वांना पडला आहे.
मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यात आज व उद्या (दि.१०,११)ला तर विदर्भातील ११ जिल्ह्यात उद्यापासून ३ दिवस (दि.११,१२,१३)ला अवकाळी वातावरणापासून सुटका मिळू शकते. त्या नंतरच्या २-३ दिवसात म्हणजे शनिवार १५ एप्रिलपर्यन्त अवकाळी वातावरण जाणवेल
उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात शनिवार १५ एप्रिलपर्यन्त केवळ अवकाळी वातावरणाचीच शक्यता जाणवते, गारपीटीची शक्यता जाणवत नाही.
रविवार दि.१६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची अपेक्षा करू या!
आज जाणवणारे बदल इतकेच!
Maharashtra Unseasonal Rainfall Weather Forecast