विशेष प्रतिनिधी, पुणे
राज्यात कोरोना निर्बंधांच्या अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (७ जून) सुरू होणार आहे. या अनलॉकमध्ये मोठा दिलासा लग्नसमारंभांना मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा व्यवसाय प्रचंड संकटात सापडला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये केवळ नोंदमी विवाहालाच परवानगी आहे. सार्वजनिक स्वरुपातील विवाह सोहळे बंद आहेत. तर काही जिल्ह्यात २५ ते ३० जणांच्या उपस्थितीत विवाहांना परवानगी आहे. अनलॉकमध्ये कोरोनाचे अनेक नियम शिथील होणार असून यामुळे पूर्वीप्रमाणेच लग्न समारंभ होणार आहेत.
महाराष्ट्र अनलॉकमध्ये लग्न सराईसाठी कसे नियम राहणार आहेत ते जाणून घेऊया
आठवड्याभरातील कोरोना बाधितांची सरासरी (पॉझिटिव्हिटी रेट) आणि ऑक्सिजनवरील बेड किती भरलेले आहेत. यानुसार पाच वर्गवारीत कोरोना निर्बंध उठविले जाणार आहेत.