विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध शिथील करण्याबाबत राज्य सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. सद्यस्थितीत प्रवासासाठी ई पास बंधनकारक आहे. सोमवारपासून (७ जुले) राज्यातील कोरोना निर्बंध शिथील होत आहेत. त्यामुळे सोमवारपासून ई पास बंधनाकारक असणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारपासून जिल्ह्यांतर्गत किंवा परजिल्ह्यात जाण्यासाठी ई पास लागणार नाही. त्यामुळे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही आपोआपच बंद होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून हे ई पास दिले जात होते. राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्यासाठी पाच स्तराचे निकष जाहिर केले आहेत. सद्यस्थितीत राज्यात पाचव्या स्तरातील एकही शहर नाही. त्यामुळे पाचव्या स्तराची कोरोना स्थिती असेल अशा शहराच ई पास आवश्यक असणार आहे. म्हणजे, राज्यात एकही शहर पाचव्या स्तरात नसल्याने ई पास बंधनकारक नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.