विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात ७ जूनपासून महाराष्ट्र अनलॉक सुरू होत आहे. याअंतर्गत सध्या लागू असलेले कोरोना निर्बंध शिथील केले जाणार आहेत. याच अनलॉकमध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थिती किती असेल याची स्पष्टता करण्यात आली आहे. सद्यस्थितीत खासगी कार्यालये उघडण्यास अनेक ठिकाणी बंद आहे. तर, कोरोना प्रादुर्भाव स्थितीनुसार १५ ते २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या सरकारी कार्यालयातील उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र अनलॉकमध्ये खासगी व सरकारी कार्यालये सरसकटपणे १०० टक्के क्षमतेने सुरू होणार नाहीत. केवळ पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील शहरे आणि जिल्ह्यांमध्ये १०० टक्के उपस्थिती राहणार आहे.
अधिक माहितीसाठी हा चार्च बघा