विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात सोमवारपासून (७ जून) कोरोना निर्बंध शिथील होत आहेत. याच अंतर्गत आवश्यक सेवांना विविध प्रकारची सूट देण्यात आली आहे. मात्र, या आवश्यक सेवा नक्की कोणत्या याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे.
आवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील
इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.
पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने.
वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम
वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.
किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.
कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.
सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस.
विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.
स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम
स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा
सेबीशी संबंधित सर्व कार्यालय
दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा
मालवाहतूक
पाणी पुरवठा सेवा
कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.
सर्व वस्तूंचे आयात-निर्यात
ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान
अधिस्वीकृती धारक पत्रकार
पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक
सर्व मालवाहतूक सेवा
डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा
शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा
वीज आणि गॅस पुरवठा सेवा
एटीएम
डाक सेवा
बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य
कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक प्रदाता, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत
कच्चामाल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या
मान्सून आणि पावसाळ्याची निगडीत उत्पादन करणारे कंपनी
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे आवश्यक घोषित केलेल्या सेवा