गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा

by India Darpan
मे 24, 2023 | 5:09 am
in राज्य
0
mantralya mudra

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल सदस्य असणार आहे. तसेच दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचे सदस्य असलेले दोन नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ज्ञ सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संचालक, आयुष सदस्य असणार असून सह सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल असा राज्य शासनाचा अधिकारी सदस्य सचिव असेल.

अध्यक्षास राज्यातील कोणत्याही विद्यापीठाच्या कुलसचिवास जेव्हा त्या विद्यापीठाच्या व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संबंधित शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज करावयाचे असेल, तेव्हा निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करता येईल. त्याचप्रमाणे अध्यक्षास उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय व आरोग्य विभाग, वास्तूशास्त्र, कृषी, आयुर्वेद, औषध वैद्यकशास्त्र, समचिकित्साशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, परिचर्या किंवा औषध निर्माणशास्त्र शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना देखील त्यांचे मत घेण्यासाठी निमंत्रित करता येईल. अशा तज्ज्ञ निमंत्रितांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या बैठकांच्या कामकाजामध्ये सहभागी होता येईल. परंतु, त्यांना मतदानाचा हक्क असणार नाही, अशा सुधारणा अधिनियमात करण्यात आल्याचे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Unaided Private Professional Education Institutes

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या सोयी-सुविधा आणि विकासासाठी झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारताच प्रा. संजीव सोनवणे यांनी केली ही मोठी घोषणा

India Darpan

Next Post
DSC 0715 scaled e1684860329330

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारताच प्रा. संजीव सोनवणे यांनी केली ही मोठी घोषणा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011