विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक ७ लाख नवीन ग्राहक जोडून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इतर ऑपरेटर्स ने मात्र घट नोंदविली आहे.
सर्व टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये जिओची सर्वाधिक ७ लाख ग्राहकांनी वाढ झाली आहे, तर भारती एअरटेलने २.५ लाख ग्राहकांची वाढ नोंदविली आहे. व्होडाफोन आयडियाने ५० हजार वापरकर्त्यांची नकारात्मक घट नोंदविली आहे. तर बीएसएनएल ४५ हजार ग्राहक गमावले आहेत.
महाराष्ट्रात ३.७० कोटी ग्राहकांसह जिओ पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर आयडिया व्होडा (वी) ३.२२ कोटी ग्राहक, भारती एअरटेल २ कोटी आणि बीएसएनएल ६५ लाख ग्राहक आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये असलेल्या ९.४२ कोटी सबस्कायबर्स मध्ये सर्व ऑपरेटर्स मिळून ८ लाख ग्राहकांची भर पडली असून मार्चमध्ये स्बस्क्राइबर्स ९.५० कोटीवर पोहोचले आहेत.
सध्या, जिओ ग्राहकांचा सर्वाधिक 38 % वाटा आहे आणि ३३.९६% शेअरसह वी दुसर्या क्रमांकावर आहे. तर भारती एअरटेलचा वाटा सुमारे २०.१४% आणि बीएसएनएलचा ७.६९ टक्के आहे. जिओने वर्क फ्रॉम होम सारखे किफायतीशीर प्लॅन्स तसेच डबल डेटा ऑफर आणल्यामुळेच त्यांच्या ग्राहकसंख्येत घसघशीत वाढ झाली. नुकताच जिओ ने लाँच केलेल्या फ्रीडम प्लॅन्स ला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जिओ ने आपली पोस्ट पेड सेवा सुरू केली असून यामध्ये डेटा रोल ओव्हर, इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा आहेत. नेटवर्क सक्षम करण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिक वेगवान नेटवर्क मिळण्यासाठी जिओ ने नुकतेच 20 MhZ स्पेक्ट्रम महाराष्ट्र आणि गोवामद्धे कार्यान्वित केले आहेत.