प्रतिनिधी, शिर्डी
कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी शासनाने अत्यंत प्रभावी उपाययोजना करत काम केले आहे. या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून कोणीही हलगर्जीपणा करू नका. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात ५० लाख रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी शासनाने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना योग्य आकडेवारी सांगितली आहे. कोरोना हे संकट अद्याप संपलेले नाही. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, आर. बी. रहाणे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, सौ. अर्चना ताई बालोडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, गणपतराव सांगळे, रामदास पाटील वाघ, विष्णुपंत रहाटळ, साहेबराव गडाख, दत्तू खुळे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून थोरात सहकारी साखर कारखाना हा तिसरा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले असून मागील कोरोना लाटेमध्ये 500 बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करताना सर्व सहकारी संस्थांनी सामाजिक बांधिलकीतून व मदतीच्या भावनेतून काम केले.
या ऑक्सिजन निर्मिती प्लांट मधून दररोज 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार असून सुमारे 100 रुग्णांना पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे. याचबरोबर आजच निळवंडे धरणाच्याजवळील पहिल्या बोगद्याचे ब्लास्टिंग करून हा बोगदा खुला करण्यात आला, हा एक सुवर्णयोग आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाला अधिक गती देण्यात आली असून 2022 च्या पावसाळ्यात या दोन्ही कालव्याद्वारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवण्यासाठी गतीने काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरूण मृत्यू पावले. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. तिसर्या लाटेचा मोठा धोका असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम मदतीच्या भावनेतून काम केले असून हवेत ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पामुळे 100 रुग्णांना दिलासा दररोज मिळणार आहे. आगामी काळात मोठ्या खाजगी हॉस्पिटल आस्थापनांनीसुद्धा स्वतःचे ऑक्सीजन प्लांट निर्माण करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सुरेश थोरात, सुभाष सांगळे, संचालक इंद्रजीत खेमनर, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, मीननाथ वरपे, अभिजित ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, संतोष मांडेकर, सौदामिनी कान्हेरे, रामदास तांबडे, किरण कानवडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.