नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्नमेंट मोफयुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या नाशिक विभागाची कार्यकारीणीची निवड झालेली असून अध्यक्ष म्हणुन सुरेश आघाव- नाशिक, उपाध्यक्ष राजश्री साळवे- नाशिक, तर सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे जळगाव यांची निवड झालेली आहे.
शॉर्टहँड कला विकास तसेच प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्य स्टेनोग्राफर्स संघटना गेल्या 54 वर्षापासून कार्य करीत आहे. नाशिक विभागाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील लघुलेखकांची अनौपचारिक बैठक नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात येथे आयोजित करण्यात आली. त्यात नवीन कार्यकरीणीची निवड झाली. कार्यकारिणीस राज्य अध्यक्ष श्री. हरीष वारुडकर, सरचिटणीस अ ॅड डी. डी. देशपांडे यांनी मान्यता देऊन अभिनंदन केले आहे.
नवनियुक्त कार्यकारिणी :
अध्यक्ष – सुरेश आघाव, (नाशिक), उपाध्यक्ष- राजश्री साळवे (नाशिक) सचिव- डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव) कोषाध्यक्ष -नवनाथ लोहकरे (नाशिक) कार्याध्यक्ष श्रीमती प्राजक्ता आघाव (अहमदनगर) कार्यकारिणी सदस्य, विकास साळवे (अहमदनगर) तुषार भामरे (नाशिक) राजेंद्र काळे (नाशिक) निर्मला चतुर (नाशिक) डॉ. महेंद्र महाजन (जळगाव) सुधीर खैरनार (धुळे) विजय सोनवणे (धुळे) संजय निकुंभे (धुळे) अशफाक शेख (नंदूरबार) दिनेश गुरव (नंदूरबार) मार्गदर्शक – दिलीप गिते (नाशिक)
Maharashtra Stenographer Association Body Declared