नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४ ते ०६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान धुळे येथे सब ज्युनिअर आणि कॅडेट गटाच्या ४९ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची निवड करण्यासाठी नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनच्या वतीने आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने यशवंत व्यायाम शाळा येथे सोमवार ३१ ऑक्टोबर, २०२२ रोजी नाशिक जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सब ज्युनियर गटाच्या खेळाडूंची जन्मतारीख ( १२ वर्षे पूर्ण आणि १५ वर्षाखालील) सन २००८ ते २०१० या वर्षा आतील असावी. तर कॅडेट गटाच्या खेळाडूंची जन्मतारीख ( १५ वर्षे पूर्ण आणि १८ वर्षाखालील) म्हणजेच सन – २००५, २००६, २००७ या वर्षा आतील असावी. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सोबत आधार कार्ड आणि जन्म तारखेचा दाखला याची सत्य प्रत आणि झेरॉक्स, एक पासपोर्ट साइजचा फोटो असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत खालील प्रमाणे वजन गट असणार आहेत. –
मुलांसाठी वजनगट – (किलो ग्राम मध्ये) २५ ते ३० , ३५ ते ४०, ४५ ते ५०, ५५, ते ६०, आणि +६६ किलो वर असे असणार आहेत तर मुलींसाठी वजनगट (किलो ग्राम मध्ये) २३ ते २८, ३२ ते ३६, ४० ते ४४, ४८ ते ५२, ५७ ते ५७ असे वजनी गट असणार आहेत.
सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सोमवार, दि. ३१/१०/२०२२ रोजी यशवंत व्यायाम शाळा, महात्मा गांधी मार्ग, नाशिक येथे संध्याकाळी ५:०० वाजता उपस्थित राहावे. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.