नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटना कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहे. या संपाच्या हालचाली सुरु असतांनाच राज्य सरचिटणीस विश्वास काटकर हे नाशिकला कर्मचा-यांच्या कार्यकारणी बैठकीसाठी आले होते.. त्यांनी इंडिया दर्पणच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर राज्याचे संघटनेचे प्रसिध्दप्रमुख सुरेंद्र सरतापे, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे, जनसंपर्क प्रमुख श्यामसुंदर जोशी हे उपस्थितीत होते. यावेळी काटकर यांची विशेष मुलाखत गौतम संचेती यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी कर्मचा-यांचे प्रश्न व संघटनेविषय़ी माहिती दिली.
बघा विशेष मुलाखत
Maharashtra State Employee Association Exclusive Interview