विश्वास जयदेव ठाकूर व प्रा. संजय नथुजी भेंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या पंचवार्षिक निवडणूक २०२२-२७ साठी विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर व प्रा. संजय नथुजी भेंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनल’ने २१ पैकी १८ जागा जिंकून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूक दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणूकीमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षातील उमेदवार उभे होते. महाराष्ट्र राज्यातून २२४ मतदारांनी निवडणूकीचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्यासाठी रिटर्नींग ऑफिसर म्हणून प्रशांत सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या निवडणूकीत विश्वास जयदेव ठाकूर (अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ), प्रा. संजय नथुजी भेंडे (इतर मागासवर्गीय मतदारसंघ), डॉ. दिगंबर गणपत दुर्गाडे (पुणे विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघ), सुभाष रामचंद्र जोशी (पुणे विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), भाऊ भगवंत कड (पुणे विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), गुलाबराव बाबुराव देवकर (नाशिक विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघ), अर्जुनराव बाबुराव गाढे (औरंगाबाद विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघ), विश्वासराव घुईखेडकर (अमरावती विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघ), रविंद्र देविदास दुरूगकर (नागपूर विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ) हे बिनविरोध निवडून आले होते. मंगळवार 22 नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या मतदान प्रक्रीयेत जगन्नाथ लक्ष्मणराव बिंगेवार (भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष प्रवर्ग), रूपा महेश देसाई-जगताप (महिला राखीव मतदारसंघ), योगिनी योगेश पोकळे (महिला राखीव मतदारसंघ), सुप्रिया जयंत पाटील (मुंबई/कोकण विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), राजेंद्र (नाना) नामदेव सूर्यवंशी (नाशिक विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), कैलास कांतीलाल जैन (नाशिक विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), मुकुंद सुंदरलाल कळमकर (औरंगाबाद विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), राजेंद्र भास्करराव महल्ले (अमरावती विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), प्रंचित अरविंद पोरेड्डीवार (नागपूर विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदारसंघ) यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
मधुसुदन रामदास पाटील (मुंबई/कोकण विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ), दिलीप बाबुराव चव्हाण (औरंगाबाद विभाग नागरी सहकारी बँक मतदारसंघ) व सिद्धार्थ तातू कांबळे (अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ) हे विरूद्ध पॅनलमधून निवडून आले आहेत.
विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी निवडणूकीत तिसर्यांदा विजय मिळवून विजयाची हॅट्रीक साधली आहे.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका या सहकार क्षेत्रातील बँकांच्या कामकाजात समन्वय साधणारी संस्था आहे. कै. जनार्दन अ. मदान यांच्या बॉम्बे प्रोव्हिन्सिअस बँकिंग इन्क्वायरी कमिटी १९२९-३० च्या शिफारशीनुसार ऑक्टोबर १९२९ मध्ये दि बॉम्बे स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि. ह्या नावाने संस्थेची स्थापना झाली. मुंबई राज्याच्या विभाजनानंतर १ जुलै १९६२ पासून ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स् असोसिएशन लि., मुंबई’ असा नावात बदल करण्यात आला. सन १९३९ मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. आर. जी. सरैय्या हे होते तर पहिले मानद सचिव कै. वैकुंठभाई मेहता होते. यानंतर कै.प्रा.डी.जी. कर्वे, कै.प्रा. धनंजयराव गाडगीळ, कै. वसंतदादा पाटील तसेच कै. विष्णू आण्णा पाटील, माननीय श्री. अजितदादा पवार या व्यक्तींनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर या संस्थेच्या मानद सचिव पदाचा भार हा कै.व्ही.पी. वर्दे, कै.सी.डी. दाते, कै.व्ही.एम. जोगळेकर, कै.डॉ.वा.चु. श्रीश्रीमाळ, डॉ.डी.बी. कदम, श्री. डी.एल. क्रियाडो यासारख्या बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी वाहिला आहे.
सहकारी बँकांना त्यांची धोरणे, कार्यपद्धती ह्याबाबत मार्गदर्शन करणारी एक मध्यवर्ती समन्वयक संस्था असोसिएशनच्या रुपाने कार्य करु लागली. सहकार खाते, अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि सहकारी बँका यामधील दुवा साधण्याचे काम असोसिएशनने करत आहे. सहकार क्षेत्रातील भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान या चतुःसुत्रीचा अवलंब असोसिएशन करत असते. सहकार पॅनलच्या या विजयाबद्दल सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, मान्यवर, तज्ज्ञ आदींनी अभिनंदन केले आहे. त्यात डॉ. शशीताई अहिरे, अजय ब्रह्मेचा, नानासाहेब सोनवणे, वसंतभाऊ गिते, दत्ता गायकवाड, वसंतराव खैरनार, अशोककाका व्यवहारे, अशोक झंवर, राजेंद्र भोसले, अद्वय हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आ. चंद्रकांत रघुवंशी, जळगांव असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मदाने, अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष घैसास, ज्ञानेश्वर महाजन आदींचा समावेश आहे.