बुधवार, ऑगस्ट 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्याच्या सहकार क्षेत्रातील मान्यवर नाशिकमध्ये…. हे आहे निमित्त

by Gautam Sancheti
सप्टेंबर 7, 2023 | 6:37 pm
in स्थानिक बातम्या
0
download 2023 09 07T183244.604

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन मुंबईतर्फे दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या २०२१-२२ चा २५ वा (रौप्य महोत्सवी) पुरस्कारांचा वितरण सोहळा नाशिक येथे संपन्न होणार आहे. नागरी सहकारी बँकांच्या गुणवत्तापुर्ण व्यवस्थापन तसेच अधिकारी व कर्मचार्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले जाणार आहे. नाशिकला शनिवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे माजी.खा. सुरेश प्रभू, खासदार हेमंत गोडसे, अजय ब्रह्मेचा, डॉ.श्रीमती शशिताई अहिरे हे उपस्थित राहणार आहेत.

२४ वर्षांनंतर प्रथमच मुंबई बाहेर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. सदर पुरस्कार सोहळ्याचे कॉर्पोरेट आयोजन असणार आहे. सोहळ्याच्या निमित्ताने स्थापनेपासूनच्या वाटचालीचा अभ्यासपूर्ण वेध घेणा-या स्मरणिकेचे तसेच असोसिएशनचे मुखपत्र असलेल्या ‘क्षितिज’च्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका या सहकार क्षेत्रातील बँकांच्या कामकाजात समन्वय साधणारी संस्था आहे. १७ ऑक्टोबर १९३९ मध्ये बँकांच्या प्रतिनिधींचे मंडळ बनवण्यात येऊन असोसिएशनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली.

सहकारी बँकांना त्यांची धोरणे, कार्यपद्धती ह्याबाबत मार्गदर्शन करणारी एक मध्यवर्ती समन्वयक संस्था असोसिएशनच्या रुपाने कार्य करु लागली. सहकार खाते, अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि सहकारी बँका ह्यामधील दुवा साधण्याचे काम असोसिएशनने समर्थपणे सुरु केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांसाठी समन्वयकाची भूमिका घेऊन सहकारी बँकेच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून येणार्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कर्मचार्यांना, संचालकांना प्रशिक्षित करणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करण्यासाठी आवश्यक तो सल्ला देणे हा उद्देश ठेवून असोसिएशनची वाटचाल चालू आहे.

पारंपरिक बँकिंगकडून आधुनिक बँकिंगकडे वाटचाल करणार्या सहकारी बँकांना सर्वप्रकारच्या तंत्रज्ञानाबाबत योग्य सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य असोसिएशन करते. त्यात सहकारी बँकांसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॉलिसी तयार करणे, कॉम्प्युटर सिस्टम ऑडिट करणे, कोअर बँकिंगसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर व नेटवर्किंग संदर्भात मार्गदर्शन करणे, बँकासाठी आय.टी. सल्लागार म्हणून काम करणे, बी.एस.एन.एल. व एम.टी.एन.एल ह्यांच्याशी लिझ लायसन्स व आय.एस.डी.एन. लाईनचे कनेक्शन बँकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, बँकांना लागणार्या सर्व पॉलिसी तयार करणे इत्यादी त्याच बरोबर आय. टी. फोरमच्या माध्यमातून सहकारी बँकांच्या तंत्रज्ञानविषयक समस्यांना, नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार बँकांमधील आय.टी. विभागातील कर्मचारी व अधिकार्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार केले आहे आणि जिल्हा मध्यवर्ती अधिकार्यांचे पॅनल म्हणून महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अधिकारी पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अधिकार्यांचे पॅनल तयार करण्यात आले आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ (तुमचं जगणं… तुमचा आवाज…) व विश्वास टर्फ क्लब (विश्वास गार्डन) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, उपाध्यक्ष वसंत विश्वासराव घुईखेडकर व संचालक मंडळ प्रा. संजय नथूजी भेंडे, रूपा महेश देसाई-जगताप, कैलास कांतीलाल जैन, प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, भाऊ भगवंत कड, राजेंद्र भास्करराव महल्ले, सिद्धार्थ तातू कांबळे, गुलाबराव बाबुराव देवकर, सुप्रिया जयंत पाटील, मुकुंदकुमार सुंदरलालजी कळमकर, राजेंद्र नामदेवराव सुर्यवंशी, अर्जुनराव बाबुराव गाढे, सुभाष रामचंद्र जोशी, रविंद्र देविदास दुरुगकर, योगिनी योगेश पोकळे, डॉ. दिगंबर गणपत दुर्गाडे, जगन्नाथ लक्ष्मणराव बिंगेवार, मधुसुदन रामदास पाटील, दिलीप बाबुराव चव्हाण तज्ञ संचालक म्हणून डॉ. विनायक यशवंत तराळे, किशोर विनायक रांगणेकर आणि प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर बाबुराव आव्हाड यांनी केलेले आहे.

कै.विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)
मा. श्री. अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार
संचालक : दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंन्ट्रल को-ऑप. बँक लि., गडचिरोली.

श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृती महिला पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)
मा. सौ. कमलादेवी विजयकुमारजी राठी
संचालिका : लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि., लातूर, जिल्हा – लातूर

सहकार महर्षी कै. बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी कार्यकर्ता पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)
मा. श्री. शरण बसवराजजी पाटील
अध्यक्ष : उमरगा जनता सहकारी बँक लि., उमरगा, जिल्हा – उस्मानाबाद.

कै वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार
मुंबई/कोकण विभाग :रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग (विशेष पुरस्कार)
पुणे विभाग : दि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूर (विशेष पुरस्कार)
नाशिक विभाग :दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंन्ट्रल को-ऑप. बँक लि., अहमदनगर.
औरंगाबाद विभाग :लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर.
नागपुर विभाग :दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंन्ट्रल को-ऑप. बँक लि., गडचिरोली.
अमरावती विभाग :दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित., अकोला.

राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला सहकारी बँक पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)
: सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर, जिल्हा-चंद्रपूर

लोकनेते कै. राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेडयुल्ड/मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार

  1. एसव्हीसी को-ऑप. बँक लि., मुंबई, जिल्हा-मुंबई
  2. श्री वीरशैव को-ऑप. बँक लि., कोल्हापूर, जिल्हा-कोल्हापूर. (विशेष पुरस्कार)

पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
रु. 100 कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका
पुणे विभाग : दि कोडोली अर्बन को-ऑप. बँक लि., कोडोली, जिल्हा – कोल्हापूर
नाशिक विभाग : साई संजीवनी को-ऑप. बँक लि., कोपरगांव, जिल्हा – अहमदनगर
श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि., यावल, जिल्हा – जळगांव (विशेष पुरस्कार)
औरंगाबाद विभाग : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि., बीड, जिल्हा – बीड
कृष्णा अर्बन को-ऑप. बँक लि., केज, जिल्हा – बीड. (विशेष पुरस्कार)
भाऊसाहेब सहकारी बँक लि., उदगीर, जिल्हा – लातूर. (विशेष पुरस्कार)

रु. 100 कोटी ते 250 कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँका
पुणे विभाग : दि तासगाव अर्बन को-ऑप. बँक लि., तासगाव, जिल्हा – सांगली.
मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी, जिल्हा – सांगली. (विशेष पुरस्कार)
नाशिक विभाग : दि अर्बन को-ऑप. बँक लि., धरणगाव, जिल्हा – जळगाव.
दि चांदवड मर्चन्टस् को-ऑप. बँक लि, चांदवड, जिल्हा – नाशिक (विशेष पुरस्कार)
औरंगाबाद विभाग : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित, जालना, जिल्हा – जालना.
वैश्य नागरी सहकारी बँक लि., परभणी, जिल्हा – परभणी. (विशेष पुरस्कार)
साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलू, जिल्हा – परभणी. (विशेष पुरस्कार)
नागपूर विभाग : वणा नागरिक सहकारी बँक लि., हिंगणघाट, जिल्हा – वर्धा.
श्रीकृष्ण को-ऑप. बँक लि., उमरेड, जिल्हा – नागपूर. (विशेष पुरस्कार)

रु.250 कोटी ते रु 500 कोटी पर्यंत ठेवी असणार्या बँका
कोकण विभाग : राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर, जिल्हा – रत्नागिरी
पुणे विभाग : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि., आटपाडी, जिल्हा – सांगली.
राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि., कागल, जिल्हा – कोल्हापूर (विशेष पुरस्कार)
नाशिक विभाग : विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक., जिल्हा – नाशिक.
दि संगमनेर मर्चंटस् को-ऑप. बँक लि., संगमनेर, जिल्हा – अहमदनगर (विशेष पुरस्कार)
नागपूर विभाग : महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि, अमरावती, जिल्हा – अमरावती.
दि वाशिम अर्बन को-ऑप. बँक लि., वाशिम, जिल्हा – वाशिम. (विशेष पुरस्कार)

रु.500 कोटी ते रु 1000 कोटी पर्यंत ठेवी असणार्या बँका
कोकण विभाग:दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लि., महाड, जिल्हा – रायगड.
नाशिक विभाग:दि हस्ती को-ऑप. बँक लि., दोंडाईचा, जिल्हा – धुळे. (विशेष पुरस्कार)

रु.1000 कोटी ते रु 1500 कोटी पर्यंत ठेवी असणार्या बँका
औरंगाबाद विभाग:श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड, जिल्हा-बीड
पगारदार नोकरांंची नागरी सहकारी बँक (संपूर्ण महाराष्ट्रातून)
दि रयत सेवक को- ऑप. बँक लि., सातारा, जिल्हा – सातारा
पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंटस् को-ऑप. अर्बन बँक लि., पुणे, जिल्हा – पुणे. (विशेष पुरस्कार)

शतकोत्त्तर वाटचाल – विशेष सन्मान
धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लि., धुळे
राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि., राजापूर
दि कुणबी सहकारी बँक लि., मुंबई.

कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँंक लि., मुंबई

  1. श्री. संजय महादेव पोळ: व्यवस्थापक, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई.
    2 श्री. दत्तात्रय धोंडीभाऊ देव्हारे : अधिकारी, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई

नामदार कै. भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
श्री. राजेंद्र मधुकर भिलारे : मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा

कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट नागरी सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार नागरी सहकारी बँका

  1. श्री. श्रीकांत एकनाथराव जाधव : मुख्य कार्यकारी अधिकारी, महेश सहकारी बँक लि., पुणे
  2. श्री. पंकज नामदेव पाटील : व्यवस्थापक. जळगांव जनता सहकारी बँक लि., जळगांव
  3. श्री. अतुल शिरीष खैरनार : अधिकारी, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या रिसर्च अॅण्ड प्लॅनिंंग डेव्हलपमेंट सेंटरमधून
मार्गदर्शन घेऊन पीएच डी प्राप्त झालेले विद्यार्थी

डॉ. अन्सारी मेहरून्निसा हफीज गुलाम दस्तागिर.
डॉ. श्री. मकरंद नारायणराव चोबे
डॉ. श्री. संदिप सुरेश खांडेकर

State Level Silver Jubilee Award Ceremony of Nashik State Cooperative Banks Association on 9th September
Maharashtra State Cooperative Bank Association Awards Nashik

    Follow India Darpan
    ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
    WhatsApp Channel
    Join Now
    Telegram Group
    Join Now
    YouTube Channel
    Subscribe

    Previous Post

    मोठा निर्णय… खासदार कोट्याबाबत रेल्वेने काढले हे आदेश

    Next Post

    महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिक आणि पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन

    Gautam Sancheti

    संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

    Next Post
    IMG 20230907 WA0286

    महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिक आणि पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन

    ताज्या बातम्या

    dada bhuse

    आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    ऑगस्ट 6, 2025
    Untitled 7

    राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

    ऑगस्ट 6, 2025
    Untitled

    ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

    ऑगस्ट 6, 2025
    Audi Extended Warranty e1754480674945

    ऑडीने ग्राहकांसाठी केली ही नव्या योजनांची घोषणा…

    ऑगस्ट 6, 2025
    crime 88

    नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज केला लंपास…

    ऑगस्ट 6, 2025
    Untitled 6

    उत्तराखंडमधील ढगफुटी; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित, हेल्प नंबर जारी

    ऑगस्ट 6, 2025
    ADVERTISEMENT
    • About Us
    • Contact us
    • Privacy Policy

    © India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

    No Result
    View All Result
    • Home
    • मुख्य बातमी
    • महत्त्वाच्या बातम्या
    • संमिश्र वार्ता
    • स्थानिक बातम्या
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • भविष्य दर्पण
    • मनोरंजन
    • क्राईम डायरी
    • इतर

    © India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011