मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी होणार आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात काय महत्त्वाचे निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून येथे सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज दुपारी चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे विरोधकांकडून त्यावर बहिष्कार टाकला जाण्याची चिन्हे आहेत. तसेच, या अधिवेशनात मंजूर करण्याचे काही प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत संमत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काय महत्त्वाते निर्णय होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra State Cabinet Meet Today Evening