मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागाचे प्रधान सचिव व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झालेले संक्षिप्त निर्णय असे
१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय. (वित्त विभाग)
२. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार. (नगर विकास विभाग)
३. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)
४. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा. (पणन विभाग)
मंत्रिमंडळ निर्णय | Cabinet Decisions:
➡️ नगरपंचायत/परिषद अध्यक्ष निवड थेट जनतेतून, अध्यक्ष/उपाध्यक्ष कार्यकाळ 2.5 वर्ष वरून 5 वर्ष, अविश्वास प्रस्तावाची मुदत 1 वर्ष ऐवजी आता 2.5 वर्ष
➡️ सरपंच थेट जनतेतून निवडणार
अविश्वास प्रस्तावाची मुदत आता 2 वर्ष #CabinetDecisions pic.twitter.com/RXWeUBDn0D— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) July 14, 2022
(सविस्तर वृत्त लवकरच)
Maharashtra State cabinet Decisions CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis