मुंबई – राज्यभरात या महिन्याच्या प्रारंभीच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवताराने दस्तक दिली आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित महाराष्ट्रामध्ये आहेत. या परिस्थितीची दखल घेऊन महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावण्यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यातच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही पुढे येत आहे. यांसदर्भात शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
डॉ. गायकवाड म्हणाल्या की, सर्व परिस्थितीवर आम्ही अत्यंत बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. दररोज आम्ही यासंदर्भातील अपडेटस घेत आहोत. जर ओमिक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत राहिली तर पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तूर्त तरी शाळा सुरूच राहतील. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन कसोशीने केले जाईल आणि विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेतली जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1473528343156781061?s=20