मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन शालेय सत्र होण्यास वेळ असले तरी स्कूलबसच्या शुल्कात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने पालकांचे टेन्शन वाढले असून इतक्या मोठ्या वाढ करण्यात येऊ नसे, अशीदेखील मागणी होऊ लागली आहे.
करोना कालावधीत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण देऊन मागील वर्षी तीस टक्क्यांनी शुल्क वाढविण्यात आले होते. त्या पाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी स्कूलबस असोसिएशने पंधरा ते वीस टक्क्यांनी शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. इंधन दरवाढ, बससंबंधीच्या साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना नाकी नऊ येत असल्याचे ‘स्कूल बस असोसिएशन’ने’ म्हटले आहे.
पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. आता नवीन बसचे दरही वाढले आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. आता नवीन बसची किंमत २८ लाख रुपये, तर मिनी बसची किंमत २१ लाख रुपये झाली आहे. तसेच सुट्टे भाग, बॅटरीचे दर १२ ते १८ टक्यांपर्यत वाढले आहेत. बस चालक व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून शालेय बसची १५ ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘स्कूल बस असोशिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.
फिटनेस टेस्टचे काय?
स्कूलबसच्या शुल्कात सातत्याने वाढ करण्यात येत असताना स्कूलबसच्या फिटनेसकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. बरेच अशा प्रकारची फिटनेस टेस्ट न करता स्कूलमध्ये बस वापरण्यात येतात. त्यातून अपघात घडतात. परिणामत: शुल्क वाढवत आहात तर स्कूलबसचा दर्जा पण तसाच ठेवा, अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे.
Maharashtra School Bus Association Decision Fee Hike