मुंबई – कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात सध्या आहे. मात्र, ही प्रतिक्षा आता संपणार आहे. राज्यात उद्यापासून (२१ एप्रिल) रेमडेसिव्हिर उंजेक्शनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. येत्या २५ एप्रिलपर्यंत जवळपास ७० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होईल, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
बघा हा व्हिडिओ
मागील एक महिन्यापासून अन्न व औषध प्रशासन विभाग रेमडेसिवीर औषध बनविणाऱ्या सर्व कंपन्यांच्या संपर्कात आहे. येत्या २१ तारखेपासून रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल व २५ तारखेपर्यंत जवळपास ७० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स दररोज राज्यात पुरवली जातील – ना. @DrShingnespeaks pic.twitter.com/TgpvFCbXsx
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 20, 2021