मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI ने मंगळवारी जारी केलेल्या अहवालानुसार मे 2023 मध्ये रिलायन्स जिओने महाराष्ट्रामध्ये 4 लाख ग्राहकांना आपल्या नेटवर्कमध्ये जोडले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एअरटेल ने नाममात्र 24,000 नवीण ग्राहकांची भर घातली. रिलायन्स जिओ 40.30 दशलक्ष ग्राहकांसह महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.
देशातील दिग्गज कंपनी व्होडा आयडिया म्हणजेच Vi ला मे महिन्यात पुन्हा एकदा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात 3 लाख 18 हजार ग्राहकांनी व्होडा-आयडियाचे नेटवर्क सोडले. सुमारे 23.80 दशलक्ष वापरकर्त्यांसह, ते बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेल 21.16 दशलक्ष यूजर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअरटेलने मे महिन्यात जवळपास 24 हजार युजर्स जोडले आहेत. वायरलेस सब्सक्राइबर अर्थात भारतातील मोबाईल कनेक्शन मार्केटमध्ये, रिलायन्स जिओ 44.06 टक्के ग्राहकांसह पहिल्या स्थानावर आहे. व्होडाफोन आयडिया 26.05% मार्केट शेअरसह दुसऱ्या आणि भारती एअरटेल 23.14% सह तिसऱ्या स्थानावर आहेत. बीएसएनएल 6.74 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
ट्रायच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात एकूण मोबाईल कनेक्शनमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात सुमारे 73000 हजार नवीन कनेक्शन जोडण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील सदस्य संख्येतही सुमारे 5 लाख 60 हजारांची वाढ दिसून आली. मे महिन्यात ग्रामीण भारतातील एकूण कनेक्शनची संख्या 51.64 दशलक्ष वरून 51.69 दशलक्ष झाली आहे. देशातील वायरलेस ग्राहकांची संख्या 114.33 दशलक्ष ओलांडली आहे. जिओने नुकत्याच बाजारात आणलेल्या जिओ भारत या 4G फोनमुळे जिओला फायदा झाल्याचे दिसून येत आहे
maharashtra reliance jio trai report sim port
mobile telecom