इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. अनेक भागात पेरणी झालेली नाही तर जिथे पेरणी झाली तिथे दुबार पेरणीचे संकट आहे. काही भागात तर तिसऱ्यांदा पेरणी होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा हवामान विभागाकडे आणि पावसाकडे लागल्या आहेत. यासंदर्भात आता अंदाज देण्यात आला आहे.
सेवानिवृत्त हवामानशास्त्र विभागाचे तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, उद्या, परवा गुरवार ते शनिवार (७,८,९) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. मूळ जागेवर व जमिनीपासून दीड किमी. उंचीपर्यन्तच्या जाडीत असलेला मान्सूनचा आस व तोही देशाच्या मध्यावर पूर्व-पश्चिम दिशेत मूळ जागेवर आहे. दक्षिण छत्तीसगड मधील रांजणगाव, दुर्ग, धामतरी शहरांच्या दरम्यान जमिनीपासून साडेसात किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थिती मुळे ह्या २-३ दिवस पावसाची शक्यता आहे. गेल्या २ दिवसात काल आणि परवा (दि.५, ६ ला) फक्त अति जोरदार पाऊस झालेली ठिकाणे आहेत.
Maharashtra Rainfall Weather IMP Climate Forecast