मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दीड आठवड्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०४ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत. त्यातच आता हवामान विभागाने पावसाबाबत इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो, असे विभागाने म्हटले आहे. येत्या तीन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भागतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.
17 Jul, पुढील ४.५ दिवस महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD pic.twitter.com/PQukwQBO3X— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 17, 2022
Maharashtra Rainfall Weather Forecast IMD