माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
मार्च महिना महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मार्च २०२३ महिन्याचे दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता ५५% जाणवते. तसेच, शनिवारपासून पुढील ५ दिवस राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता आहे.
संपूर्ण २०२३ च्या उन्हाळ्यातील ३ महिन्यात मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण ३ महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५% जाणवते.
महाराष्ट्रातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात मार्च २०२३ महिन्याचे पहाटेचे किमान तापमान हे मार्च महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५ % जाणवते.
संपूर्ण उन्हाळा- संपूर्ण उन्हाळ्यात ३ महिने पहाटेचे किमान तापमान सोलापूर मराठवाडा बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात ३ महिन्याच्या सरासरी इतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता ४५% जाणवते.
मुंबई सह संपूर्ण कोकण विभाग व वरील १२ जिल्ह्यात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेची शक्यताही ४५% तर संपूर्ण उन्हाळ्याच्या ३ महिन्यात ६५% जाणवते.
मार्च २०२३ महिन्यात नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पावसाच्या सरासरी पेक्षा कमी असण्याची तर उर्वरित जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक असण्याची शक्यता ४५% जाणवते.
देशाच्या वायव्य राजस्थान तसेच दक्षिण पाकिस्तान दरम्यानची दीड किमी उंची पर्यंतची चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे शनिवार दि. ४ मार्चपासून त्यापुढील ५ दिवस ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगांव, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अधिक आहे. क्वचितच तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक घाबरून न जाता शेतकामाच्या नियोजनात सावधानता बाळगावी, असे वाटते. मात्र ४, ५, ६ मार्च असे ३ दिवस महाराष्ट्रात उष्णतेची काहिलीही जाणवू शकते.
सध्या इतकेच!
वातावरणात पुन्हा एकाकी काही बदल झाल्यास कळवले जाईल.
Maharashtra Rainfall Weather Forecast Climate